मुनगंटीवार साधणार नागरिकांशी संवाद

चंद्रपूर : पोंभुर्णा शहराच्‍या विकासाचे अचुक नियोजन करण्‍याच्‍या द़ृष्‍टीने वित्‍त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन पोंभुर्णा शहरात 3 डिसेंबर रोजी चौक जनसंपर्क अभियान राबविण्‍यात येणार आहे.
3 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते सायं. 6 वा. दरम्‍यान आयोजित चौक जनसंपर्क अभियानात वित्‍तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार स्‍वतः सहभागी होणार आहे. या चौक जनसंपर्क अभियानादरम्‍यान पोंभुर्णा शहरातील 7 वार्डातील चौकांमध्‍ये वित्‍तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार भाजपा पदाधिका-यांसह, नव्‍याने रूजु झालेल्‍या नगर पंचायतीच्‍या सदस्‍यांसह जनतेशी संवाद साधत शहराच्‍या नियोजनाची दिशा निश्‍चीत करतील. दुपारी 3.00 वा. शास्‍त्रीनगर वार्ड, 3.30 वा. जुना बाजार चौक, 4.00 वा. आदिवासी चौक, सायं. 5.00 वा. आंबेडकर चौक, 5.30 वा. विठ्ठल कस्‍तुरे यांच्‍या घराजवळील चौकात, 6.00 वा. हनुमान चौक, 6.30 वा. चेक पोंभुर्णा चौकात नागरिकांशी संवाद साधण्‍यात येणार आहे.

या चौक संपर्क अभियानात ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस हरीश शर्मा, पोंभुर्णा भाजपाचे अध्‍यक्ष तथा पोंभुर्णा नगर पंचायतीचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्‍यक्ष ईश्‍वर नैताम, जि.प. सदस्‍या अल्‍का आत्राम, पं.स. सभापती बापूजी चिंचोळकर, उपसभापती महेश रणदिवे, कृउबास सभापती राहूल संतोषवार, कृउबास संचालक नंदकिशोर तुम्‍मूलवार, अजित मंगळगिरीवार, पं.स. सदस्‍या भारती कन्‍नाके, भाजपा तालुका सरचिटणीस ओमदेव पाल, भाजपा महिला अध्‍यक्षा वर्षा मोहुर्ले यांची यांची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.
पोंभुर्णा शहराच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2 कोटी रू. निधी मंजुर करविला आहे. येत्‍या काळात आणखी मोठया प्रमाणावर निधी या शहराच्‍या विकासासाठी उपलब्‍ध करण्‍याचे त्‍यांचे नियोजन आहे. पोंभुर्णा शहराच्‍या विकासाची दिशा, तसेच नियोजनाची रूपरेषा ठरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आयोजित या चौक जनसंपर्क अभियानात नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन भाजपा पोंभुर्णा शहर शाखेतर्फे करण्‍यात आले आहे.