खुशाल जागा हो"काव्य संग्रहाचे लोकार्पण संपन्न :-



  राष्ट्रपिता जोतीराव फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व मूलनिवासी नायक-नाईकांच्या विचारांचे समाज प्रबोधन पर गीत संग्रह *"खुशाल जागा हो"* लोककवी  व गायक मू.के.जी. साव यांचा लोकार्पण सोहळा दि.16/10/26 ला दिक्षाभुमी बुक स्टॉल.चंद्रपूर येथे सायं.सात वा.संपन्न झाला.प्रकाशक मू.जी.के.उपरे,अध्यक्ष, बौद्ध धम्म प्रसार व साहित्य प्रकाशन संस्था बल्लारपूर व माजी मानद सचिव सि.डी.सी.सी.बैंक,चंद्रपूर होते.उदघाटक मू.एच.सी.सहारे व मुख्य अतिथी तेलंगानाचे लोककवी व लेखक मू.मधु बावलकर, आदिलाबाद तर अथिती संविधान प्रबोधक गायक मू.नभा वाघमारे,कवी व गायक के.जी.साव, गायक मू.रमेश रामटेके,बल्लारपूर,मू.आनंद मेश्राम, नागपूर, संदीप वाघमारे,मू.देवानंद  रायपुरे,राहुल मडामे, नागपूर,मू.सेवकदास बरके,मू.महेंद्र खंडाळे उपस्थित होते.काव्य संग्रहाचे लोकार्पण मू.एच.सी.सहारे व मंचावरील अतिथीगणांनी केले.प्रास्ताविक संस्थेचे सचिव मू.एम.टी.साव सर यांनी केले.त्यांनी संस्थेची वाटचाल विषद करून आता पर्यंत एकुण आठ पुस्तकांचे लोकार्पण केल्याचे सांगितले. "खुशाल जागा हो" हे नववे पुस्तक आज प्रकाशित होत असल्याचा आनंद व्यक्त केला.यात दोन पुस्तकांचे हिंदीत अनुवाद झालेत.या गीत-संग्रहासाठी विषेश प्रयत्न मू.प्रा.डाॅ.मृदुला रायपुरे-जांगडेकर यांनी टायटल सह दर्शनी पृष्ठ व प्रस्तावना देवुन अविस्मरणीय कार्य केले.त्यांचे आणि आर्थिक मदत व स्टेज दिल्याबद्दल वरिल सर्वांचे आभार व्यक्त केले.
संचलन मू.पंकज जांगडेकर सर यांनी तर आभार मू.मिलिंद खोब्रगडे यांनी मानले.
प्रती,मा..वसंतराव मून.....................................................स.न.वि.वि.
वरिल बातमी आपल्या वृत्त पत्रातून प्रकाशित करून उपकृत कराल ही विनंती.
आपला
एम.टी.साव सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!