बैलबंडीला ट्रकची धडक; जखमी चालकाचा मृत्यू नागपूरच्या एम्समध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास




तळोधी (बा.) : 
       बैलबंडीला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या नतू श्रीराम चचाने (वय ५५) यांचा शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता ओवाळा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात एक बैल जागीच ठार झाला, तर नत्थु श्रीराम चचाने वय 52 गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृतीमुळे १६ ऑक्टोबर रोजी त्यांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
या अपघातानंतर ‘शेरू’ नामक कुत्रा जखमी बैल व बैलबंडीजवळ पहारा देत थांबल्याने त्याच्या निष्ठेची परिसरात चर्चा झाली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर उद्या, रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!