मदतीचा हात पुढे! नगरसेविका अश्विनीताई रुपेश निकोडे यांचा अनुकरणीय वाढदिवस
सध्या वाढदिवस म्हटलं की मोठ-मोठे बॅनर, डीजे आणि गाजावाजा हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र याला अपवाद ठरत आहेत मूल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका *मा. अश्विनीताई रुपेश निकोडे.*
आज अश्विनीताईंचा वाढदिवस असून, त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर लावणार नाहीत, तसेच कोणताही गाजावाजा करणार नाहीत असा निर्धार केला आहे. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून, राज्यातील *दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी* त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत देणार आहेत.
या मदतीचा धनादेश लवकरच राज्याचे माजी मंत्री व बल्लारपूरचे लोकप्रिय आमदार *मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री निधीकडे सुपूर्द केला जाणार आहे.
अश्विनीताईंच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजासाठी धावून जाण्याची त्यांची ही भूमिका खरोखरच सर्व लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा अशीच आहे.
> "माझा वाढदिवस हा माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. शेतकरी जगला तरच आपण जगू. म्हणून बॅनरबाजीपेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते," अशी भावना अश्विनीताई निकोडे यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्यासोबत रुपेश निकोडे व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!