महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांची भिसीतील प्राचीन हेमांडपंथी मंदिरासह दुर्गा उत्सव मंडळांना सदिच्छा भेट
देवीचे दर्शन घेत नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील अपर तहसील भिसी येथील प्रसिद्ध प्राचीन हेमांडपंथी मंदिर (मोठा मंदिर) तसेच शहरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्राचीन मंदिरातील देवीचे मनोभावे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच उपस्थित भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीदरम्यान आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणुकीची पूर्वतयारी, पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविणे, पक्षसंघटना अधिक मजबूत करणे तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतानाच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक कार्याला गती देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या प्रसंगी ज्येष्ठ नेते मधुभाऊ मुंगले, ललितभाऊ डुकरे, मेहर सर, शुभमभाऊ गिरडे, महेशभाऊ रामटके (नगरसेवक, प्रभाग क्रमांक ११), दिपकभाऊ ठोंबरे, किशोरभाऊ गभणे, मनीषभाऊ महाजन, विकास रामटके, सोज्वल डुकरे, सौ. ज्योती विजय मुंगले (नगरसेविका, प्रभाग क्रमांक १७), कल्पना मुंगले, सौ. काजल चिडे, सौ. अजिता मुंगले, खुशी मुंगले यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, दुर्गा उत्सव मंडळांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!