नवभारत विद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा
नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे
अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
मूल : दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूल येथे अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. सी. जी. बारसागडे सर होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. विजय सिद्धावार सर, पत्रकार व संपादक, पब्लिक पंचनामा तसेच ज्येष्ठ शिक्षिका कु. प्रतिमा उमक मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि अभिजात भाषेचा गौरव याविषयी मनोगत व्यक्त केले. कु. दीक्षा बनकर, आर्यन लेनगुरे आणि कु. नम्रता गेडाम या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. एस. माथनकर सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. उदयचंद चौधरी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मोडक सर, बोढे सर, निखारे सर, गोंगल मॅडम तलांडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वैभव आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!