सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा पुढाकार; ताडाळी व मोरवा येथे नेत्र तपासनी सोबत मोफ़त चष्मा वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा पुढाकार; ताडाळी व मोरवा येथे नेत्र तपासनी सोबत मोफ़त चष्मा वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न



चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी आणि मोरवा येथे नेत्र तपासनी व मोफ़त चष्मा वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे महाप्रबंधक श्री. देवेश कुमार यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ताडाळी येथे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी, व मोरवा येथे १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दृष्टी ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज असून, डोळ्यांच्या समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन डोळ्यांची तपासणी झालेल्या नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. आरोग्यसेवा केवळ उपचारांपुरती मर्यादित न ठेवता ती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या कार्यक्रमाला धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, मोरवा गावच्या सरपंच सौ. स्नेहा साव, ताडाळीचे उपसरपंच श्री. निखिलेश चामरे, आणि श्री. प्रतीक वानखेडे यांची उपस्थिती लाभली.

ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देत त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी संस्थेने केलेला हा प्रयत्न सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित करणारा ठरला.

“निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!