मूल च्या खेळाडूंनी मारली बाजी वेटलिफ्टिंग खेळातील विजयाची शृंखला कायम!

जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत मूल च्या खेळाडूंनी मारली बाजी वेटलिफ्टिंग खेळातील विजयाची शृंखला कायम!


दि.3 आक्टोंबर रोजी शनिवारला क्रीडा व युवक सेवा सचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नागपूर  येथे नागपूर विभागीय  शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धां पार पडली. दरवर्षी प्रमाणे  मूल तालुक्यातील क्रीडा संकुल चे वेटलिफ्टिंग NIS कोच करण सुरेश कोसरे यांच्या कडे निशुल्क प्रशिक्षण घेत असलेले विविध शाळेतील खेळाडूंनी चंद्रपूर जिल्ह्याचे  प्रतिनिधित्व केले या स्पर्धेत एकूण चार खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत विजय संपादन केलेला आहे. यामध्ये 
 *19 वर्षाखालील मुलींमध्ये*
   1. 48 किलो वजन गटात जसविंदरकौर कर्नलसिंग बावरी
  2. 53 किलो वजन गटांमध्ये श्रावणी किशोर आंबूलकर
 3. 58 किलो वजन गटात 
     शिवाणी जालिंद्र वाढई 

या चार खेळाडूंनी इतर खेळाडूवर मात करीत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे तर

*17 वर्षा आतील मुलींमध्ये*
 
1. 48 किलो वजन गटांत 
        ईशानी मोहूर्ले
2. 77 किलो वरीलवजन गटांत प्रणाली झरकर 
आणि 19 वर्षे वयोगटातील मुला मध्ये 

 1. अमन फारुख शेख 

या तीन खेळाडूंनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे
     
तालुक्याचे ठिकाण असलेले मूल शहर क्रीडा क्षेत्रात भरभरुन कार्य करीत आहे.याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मूल शहराने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. मागील चार वर्षापासून मुल मध्ये निःशुल्क वेटलिफ्टिंग खेळाच्या च्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. सलग यंदाही चंद्रपूर जिल्ह्यात वेटलिफ्टिंग मध्ये मूल शहराचेच नाव अव्वल ठरलेले आहे.

दिनांक 13 ते 15 ऑक्टोंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली असून विजयी खेळाडू राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधी करणार आहात...
 जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे सर, नामदेवजी पिजुरकर सर, रुपचंद उराडे सर, आकाश चौधरी सर स्वप्निल अवघडे सर यांच्यातर्फे खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!