भटाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळ नापिकीमुळे घेण्यात आले टोकाचे पाऊल

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील एकीकडे सुरू असलेल्या कोरडा दुष्काळ तसेच कर्जामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला असून. संसुदीच्या काळात शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. पाऊसाने दांडी मारल्याने ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवल्याने शेतकरी राजावर देशोधडीला लागण्याची परिस्थिती ओढावली आहे. अशातच भटाळा येथील शेतकरी चिंदु रामचंद्र बावणे वय 63 वर्षे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.

भटाळा येथील शेतकरी बावणे यांना दीड एकर शेती असून शेती पिकासाठी घेतलेले कर्ज तसेच  पडलेल्या कोरडा दुष्काळामुळे, नापिके मुळे वारंवार चिंतेत असलेले शेतकरी चिंदू रामचंद्र बावणे यांनी तीन दिवसाआधी  आपल्या शेतामध्ये विष प्राशन केले होते, यावेळी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करून  चंद्रपुर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू असताना चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे.

घटनेची माहिती मिळतात भटाळा गावात शोककडा पसरली असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा अप्त परिवार आहे, यावेळी आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते किशोर डुकरे, गावातील नागरिक यांनी प्रशासनाला केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!