ईद-ए-मिलाद-उन-नबी सण अत्यंत उत्साहात व शांततेत साजरा
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव बु येथे जामा मस्जिद तसेच पैगामे रजा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी करण्यात आली .मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते त्या अनुसंगाने शेगाव बु येथील सर्व नागरिकांनी एकात्मतेचा प्रतीक दिला.यावेळी शेगाव बु पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव, सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते,पैगमे रजा कमेटी द्वारे रॅलीच्या वेळी सर्वांना गोडखीर देण्यात आली तसेच मिरवणूक संपल्यावर कार्यक्रम स्थळी सगळ्यांनी एकत्र येऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.या कार्यक्रमात पैगामे रजा कमेटीचे अध्यक्ष मुज्जमिल शेख, डॉक्टर पठाण,शादाब शेख, एजाज शेख,फराज शेख, जलील शेख,हाजी मोबिन शेख, मुन्ना शेख,मतीन शेख, अन्सार शेख,हसिफ शेख, नोमान शेख,उबेद शेख, आयाज शेख, मिनाज ,इर्शाद,फइम शेख, शेरखान पठान,मुस्ताक शेख,गनी भाइ,वकील मौलाना सा., मस्जिदचे मौलाना वसीम रीजवी यांनी पूर्ण प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या निमित्ताने सर्व धर्म समभावाचा संदेश सर्व गावाला देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!