भाजपाच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मूल शहर भाजपाच्या वतीने सत्कार
मूल, दि. ___ : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीत विविध पदांवर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी, मूल शहराच्या वतीने भाजपा शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यामध्ये युवा मोर्चा जिल्हा महामंत्री राकेश ठाकरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंदूभाऊ रणदिवे, प्रभाकर भोयर व उषाताई शेंडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष जीवन कोणत्मवार, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष अजय गोगुलवार, पदवीधर आघाडी सहसंयोजक युवराज चावरे, जिल्हा कार्यक्रम प्रमुख किरणताई कापगते, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री शिवानी आगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवी बोकारे तसेच फ्रेंड्स ऑफ बीजेपी सहसंयोजक सौ. आकेवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल तसेच पक्षाचे विचार व जनकल्याणकारी उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, मूल शहराच्या वतीने करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!