भिसी परिसरात अवैध दारू विक्रीचा पुरवठा सुरूच; कारवाईचा प्रश्न ऐरणीवर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री व पुरवठा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती मागील अनेक वर्षांपासून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून विविध भागात दारूचा पुरवठा करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

नागरिकांच्या मते, सर्वसामान्य व्यक्तींवर किरकोळ प्रमाणात दारू विक्री केल्यास तात्काळ कारवाई होत असते. मात्र मोठ्या प्रमाणावर अवैध पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असूनही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.

परिसरातील नागरिकांनी अवैध दारू पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणात दारूचा साठा व पुरवठा होत असल्यास तो नेमका कुठून येतो, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. बरेश्या ठीकानी बनावट दारू येत असल्याने नागरीकांच्या जिवाला धोक्का निर्माण झाले आहे.

तसेच, अवैध दारू विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी

अवैध दारू पुरवठ्याची निष्पक्ष चौकशी करावी.

संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

पुरवठा साखळीचा शोध घेऊन मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचावे.

भिसी परिसरात विशेष तपास मोहीम राबवावी.


(टीप : वरील वृत्तातील काही आरोप व दावे हे स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेले असून त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित यंत्रणांनी चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे अपेक्षित आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!