व्याहाड खुर्दची आर्या पुण्यपवार १० च्या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यात तिसरी
सावली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE ) परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष पुण्यपवार यांची मुलगी कु. आर्या हिने सिबिएसई अभ्यासक्रमात दहावीत ९७.२ टक्के मिळवित गडचिरोली जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकवीला असून ज्यूबिली प्लॅटिनम हायस्कुल गडचिरोली येथून पहिला क्रमांक आला आहे. भविष्यात आयआयटी, युपीएस्सी कडे लक्ष देण्याचा मानस तीने व्यक्त केला आहे. यशाबद्दल सावली तालुक्यात तीचे कौतुक केल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!