४ मार्च लाईनमन दिवस चिमूर विद्युत कार्यालय येथे साजरा
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - पायाभूत सुविधा व विद्युत वितरण व्यवस्था राखण्यासाठी लाईनमन ला धोकादायक परिस्थिती चा सामना करावा लागतो त्यामुळे राष्ट्रीय त्यांची भूमिका मान्य करण्यासाठी व त्यांना मान देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण भारतात ४ मार्च ला लाईनमन दिवस हा साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास नवघरे कार्यकारी अभियंता विभाग वरोरा कार्यक्रमाचे आयोजक संजय जळगावकर उप कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता दडमल यांनी समस्त लाईनमन ला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लंजे, खोब्रागडे, निखारे तथा समस्त तालुक्यातील लाईनमन यांची यावेळी उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!