पुढील चार वर्षात पिपरबोडी चिनोरा गावात विविध विकास कामे करणार - आमदार करण देवतळे
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात स्पष्टोक्ती
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - येणाऱ्या पुढील चार वर्षात विविध योजनांमधून तसेच आमदार निधी मधून पिपरबोडी चिनोरा येथे विविध विकास कामे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिपरबोडी चिंनोरा येथे उद्घाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतुल दडमल अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पिपरबोडी ,प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ताई परचाके चिनोरा ,उपसरपंच वंदना ढेंगळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, पत्रकार धर्मेंद्र शेरकुरे ,ग्रामपंचायत सदस्य निलेश डोंगरकार ,छाया कोल्हेकर , माजी सदस्य अविनाश ढेंगळे , माजी सरपंच सुशिला तेलमोरे व ग्रामपंचायत पदाधिकारीव शाळेचे मुख्याध्यापक साठे व सुनिल बुरिले, यांची उपस्थिती होती.नवनियुक्त बीएसएफ जवान स्वप्निल पवार यांचा जाहीर सत्कार आमदार करण देवतळे व आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरबोडी येथे 26 जानेवारी 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तिनं शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पिपरबोडी,चीनोरा व हुडकी खदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी सहभाग घेतला प्रमुख पाहुण्यांसमोर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एकल नृत्य,सामूहिक नृत्य, नाटक व देशभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण केले जिल्हा परिषद शाळा चिनोरा शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाकर नन्नावरे यांच्या हस्ते बक्षीस पर सन्मानचिन्ह व नोटबुक पेन देण्यात आले ,हुडकी खदान शाळेला शाळेचे माजी अध्यक्ष रवींद्र शेरकुरे यांच्या हस्ते बक्षीस पर सन्मानचिन्ह व नोटबुक पेन देण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपरबोडी शाळेला अतुल दडमल यांच्या हस्ते बक्षीस पर सन्मानचिन्ह व नोटबुक देऊन सन्मानित करण्यात आले व सचिन घोसरे यांचेकडून अंगणवाडी केंद्राला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी सोयाम केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दयासागर मोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते त्रिशूल निबुदे ,सचिन घोसरे,प्रवीण ज्ञानेश्वर नंनावरे ,जितेंद्र नंनावरे ,प्रमोद घोसरे ,राजेश्वर नंनावरे ,नेपाल शेरकुरे,यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!