दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातून पर्स पळवली - सावली शहरात भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ
सावली - सावली शहरात भर वस्तीत दुपारच्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या पाठीमागून स्कुटीने पाठलाग करीत पर्स पळवली. हा प्रकार त्या भागात असलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात आल्याने खळबळ माजली असून पर्समध्ये ४२ हजार रुपये असल्याची तक्रार महिलेने केली आहे.
लोंढोली येथील रहिवासी असलेली कविता दुमाजी बोदलकर ही बचत गटाचे व्यवहार करण्यासाठी सावली बँकेत आली होती. ती कन्नमवार चौकातून जात असतांना पाठीमागून एका दुचाकीवरून दोन व्यक्ती आले व हातातील पर्स पळवली. यावेळी महिलेने दुचाकीचा पाठलाग करीत आरडाओरड केली मात्र चोर पळून जाण्यास सफल झाले. हा प्रकार महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्थेत असलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सावली पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!