मौजा कपर्ला ग्राम पंचायत ग्राम सभा ठरली वाद-विवादात

मौजा कपर्ला ग्राम पंचायत ग्राम सभा ठरली वाद-विवादात

सरपंच व ग्रामसेवकावर भष्ठाचाराचा आरोप

ग्रामस्थानिकानी घेतली आक्रमकाची भुमीका


तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा कपर्ला ग्राम पंचायत ची ग्राम सभा ठरली वाद-विवादाच्या भोवऱ्यात झाली.मागील तीन महीण्या पासुन ग्रामस्थानिकानी ग्राम सभा घेण्याचा आग्रह करीत होते. पण सरपंच रंजना दडमल व ग्रामसेवक प्रफुल गायकवाड हे ग्राम सभा घेण्यास टाळा-टाळी करीत होते.सेवट दि.२६ डिसेंबरला घेण्यात आली.सर्व ग्रामस्थानिक एकत्रीत झाले होते.अंदाजे दुपारी १२:०० वा. ग्राम सभेला सुरवात झाली.सरपंच व ग्राम सेवकावर भष्ठाचाराचे आरोप ग्रामस्थानिक मागिल चार पाच महीण्या पासुन करीत आहे.पंचायत समीतीच्या सर्वंग विकास अधिकारी व तहसिलदारांना ग्रामस्थानिकांनी गैरव्यवार प्रकरणा चे पत्र व्यवहार निवेदना द्वारे देण्यात आले होते पण आता पर्यंत कोणत्याही प्रकारची सरपंच व ग्रामसेवकाची चौकसी करण्यात आली नाही.या सभे मध्ये प्रत्येक प्रकरणात भष्ठाचाराचे प्रकरण समोर आले.या सभेत ठराव घेण्यात आल पण ठरावाच्या प्रत वर ग्रामसेवक सही मारीत नसल्याने ग्रामस्थानिक आक्रमक भुमीका घेतली.आम्हा आजच ठरावाची प्रत पाहीजे पण ग्रामसेवक टाळा-टाळ करीत होता.सोमवार ला ठरावाची प्रत देतो अश्या प्रकरचे उत्तर ग्रामसेवक देत असल्याने ग्रामस्थानिकानी  बाहेरून टाळा लावले.ग्रामस्थानिकांनी भिसी पोलीसांना या घटने बद्दल सुचना देण्यात आली.तसेच सर्वंग विकास अधिकाऱ्याला फोन करून सर्व प्रकरणाची माहीती दिली व फोन द्वारे ग्रामसेवकाला सुचणा देण्यात आली की तुम्ही आताच ग्रामसभेची ठरावाची प्रत काठून द्या अश्या प्रकारची सुचना आल्या नंतर ग्रामसेवकानी ठरावाची प्रत काठून दिली.कपर्ला ग्राम पंचायत झालेल्या भष्ठाचाराची चौकसी वरीष्ठा अधिकाऱ्या कडून करण्यात यावी. अश्या प्रकारची मागणी ग्रामस्थानिका कडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!