शेंद्री बुजरूक ते कोंढा रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील शेंद्री बुद्रुक ते कोंढा रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य असून एका महिन्यात चार एक्सीडेंट झालेले आहेत. परंतु ह्या कचऱ्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे सेंद्रि बुजरूक येथील परमात्मा एक सेवक च्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचा आपल्याला काही देणं आहे ही भावना मनाशी बाळगून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा स्वच्छ करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संजू चोपकर, वामन कुलुरकर ,आशिष बागडे, सत्तेवीर बनकर, उद्द्ल नागरीकर, गजानन बागडे, मनोज वनीकर, यांनी केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!