ज्वेलरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्यचांदीचे दागीने केले लंंपास..

ज्वेलरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्यचांदीचे दागीने केले लंंपास..


सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चोरट्यांचे भद्रावती पोलिसांना आव्हान ...

भद्रावती...जगदीश पेंदाम

अज्ञात चोरट्यांनी ज्वेलरीचे दुकान फोडून दुकानातील चांदी तथा सोन्याची दागीने असा ३ लाख ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घोडपेठ येथे उघडकीस आली असुन चोरट्यांनी गावातील एका मेडीकल दुकान फोडली मात्र या दुकानातून काहिही चोरीला गेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
 चंद्रपुर येथील शिवम वर्मा यांचे घोडपेठ येथे शाम ज्वेलर्स नावाचे ज्वेलरीचे  दुकान मागील अनेक दिवसापासून आहे.सदर दुकान त्यांची आई चालवित असुन घटनेच्या आदल्या दिवशी त्यांची आई नेहमीप्रमाने रात्रोला दुकान बंद करुन चंद्रपूरला गेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान फोडुन असल्याची माहिती घोडपेठ येथील त्यांच्या शेजारच्याने त्यांना फोनवर दिली माहिती मिळाल्यानंतर वर्मा यांनी घोडपेठ येथे येऊन दुकानाची पाहणी केली असता दुकानात ठेवलेले दोन लाख सत्तर हजाराचे चांदीचे तसेच नव्वद हजाराचे सोन्याचे दागीने असा एकुन तिन लाख सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.सदर घटना सिसीटिव्ही कैमेऱ्यात कैद झाली आहे.सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आली असुन भद्रावती पोलीस सिसीटिव्ही फुटेज व श्वानपथकाच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!