चारगावात चुलत भावावर तलवारीने वार - घटनेतील गंभीर जखमीवर गडचिरोलीत उपचार सुरु
सावली - चारगाव येथे तलवारीने वार केल्याने नरेश कृष्णा आडे (वय २७) हा गंभीर जखमी झाला असून त्यांचेवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
सावली तालुक्यातील चारगाव येथील नरेश आडे हा एका लहान मुलाला गाडीवर बसवून डिझेल कॅन आणत असतांना रविवारी सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान टपून असलेल्या कुणाल अनिल आडे (वय २३) याने चारगाव नदीजवळ तलवारीने वार केला. यात नरेशच्या डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाला. सोबत असणारा लहान मुलगा गाडीवरून पडला व लगेच पुलाचे काम करणाऱ्या मजुरांना हाक मारली. मजूर घटनास्थळी येताच आरोपीने पळ काढला. याबाबत सावली पोलिसांना कळविले असता आरोपीस अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३(५) अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. शेतीच्या वाद असल्याने राग मनात आरोपीने हल्ला केल्याचे बोलल्या जात असून यापूर्वी आरोपीने अनेकांना मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!