स्वप्नपूर्ती रक्त सेवा व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न .
तळोधी वार्ताहर :-
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे स्वप्नपूर्ती रक्त सेवा सावरगाव व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर संयोजक जिल्हा चंद्रपूर यांचे तर्फे भव्य रक्तदान शिबिर मंगळवारला संपन्न झाला यात 42. रक्तदात्यांनी रक्तदान केले तर विशेष म्हणजे वडसावित्रीचे दिवशी 2. महिलांनी रक्तदान केले
रक्तदान हे मौल्यवान जीवन रक्षक दान आहे इतर कामात आपले योगदान जरी कमी असले तरी एखाद्या चा जीव वाचवण्यात रक्तदान मोलाचे ठरू शकते म्हणूनच " रक्तदान हे श्रेष्ठ दान " हे ब्रीद वाक्य अंगीकारून मोबाईल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आज पर्यंत हजारो गरजूंना रक्ताची उपलब्धता करून देत एक सामाजिक बांधिलकी जपत व प्रामाणिक जबाबदारी स्वीकारणारा "स्वप्नपूर्ती रक्त सेवा सावरगाव ग्रुप " व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर संयोजक जिल्हा चंद्रपूर यांचे संयुक्त माध्यमातून नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिर संपन्न झाला शिबिरात 42. रक्तदात्यांनी रक्तदान केले तर यात दोन महिलांचा विशेषत्वाने सहभाग होता त्यात छाया रुकाजी बोरकर व दीपा चूनारकर या महिलांनी वळसावित्रीच्या दिवशी रक्तदान करून विशेषत्वाने आदर्श निर्माण केला
सर्वप्रथम यावर्षीच्या नवविवाहित दांपत्य नितेश प्रकाश टीकरे , वेदप्रकाश गजानन मेश्राम,
या नवदांपत्याने रक्तदान करून रक्तदान कार्याला सुरुवात केली. यावेळी प्रामुख्याने डॉ. धनंजय ठीकरे , संगीता हेलोंडे मॅडम ठाणेदार तळोधी , तोसिफभाई काजी, मुख्याध्यापक राजेश शेंडे सर यांची विशेष उपस्थिती होती विशेष सहकार्य
विकास बोरकर, सचिन निकुरे , सामाजिक कार्यकर्ते , गिरीधर निकुरे , अनिकेत झोडे, रोहित कापेवार , प्रणय सहारे , कमलकिशोर चुनारकर , करण गायकवाड , सौरभ बोरकर , संकेत दामपल्लीवार , विशाल शेंद्रे , आवेश शेख , पिंटू शेख , कलश शेंद्रे, पियुष पर्वतकार, ताम्रपाल शेंद्रे , कुणाल सोनवाणे, रितेश बोरकर , मुकुल सावरकर , भूषण भंडारे , योगी निकुरे ,वनिता निकुरे , ज्योती निकुरे ,सुषमा निकुरे , रागिना निकुरे जीवन ज्योती ब्लड बँकेचे सरोज पवनीकर मॅडम ,लोकेश देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!