शेतातील विहीरीत आत्महत्या
नागभिड:
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील
वलनी येथील वामन महादेव खोब्रागडे वय ६० वर्षे या शेतकऱ्यांने आपल्याच सोनुली चक नांदेड रोडवरील नहराजवळील शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
मृतक व्यक्ती हा कालपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोधाशोध घेणे सुरू असताना आज दुपारी दोन वाजता मुलाला शेतातील विहिरीमध्ये त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन तळोधी येथे देण्यात आली तळोधी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठविले. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्या करणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे कळले.
त्यांच्या पाठीमागे आई,पत्नी,दोन मुले सुना व नातवंडे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!