खड्यांमुळे शेतकऱ्यांना शेती कसता येईना - पाईपलाईन कामासाठी खोदलेले खड्डे उघड्यावर @ असोलामेंढा प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सावली - गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना भूमिगत पाईपलाईनद्वारे देण्यासाठी खड्डे खोदले मात्र शेती कसण्याचा हंगाम सुरु होऊनही ते खड्डे बुजविले नसल्याने खेडी मायनरच्या लाभधारक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर शेतातील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी होत आहे.
सावली तालुक्यातील खेडी मायनरचे काम मागील ५ वर्षांपासून सुरु आहे. पण सदर काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. अनेकदा पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले मात्र पाईप न टाकताच बुजविण्याची वेळ आलेली होती. यावर्षीही रेड्डी नामक ठेकेदारकडून कामाला सुरवात करण्यात आली. खेडी लाभ क्षेत्रातील शेतात पाईप टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले, काही ठिकाणी पाईपही जोडलेले नाही. मात्र ते काम अजूनही अर्धवट स्थितीत असून शेती कसण्याच्या हंगामात खड्डे कधी बुजवणार हा प्रश्न शेतकरी करीत कंत्राटदार व प्रकल्प कार्यालयाचे उंबरठे झीजवत आहेत. त्यामुळे तात्काळ शेतातील खड्डे बुजविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!