विदर्भ क्रांती संघटनेचा तहसील कार्यालयावर आगळा वेगळा आंदोलन
सामूहिक आत्मदाहणाचा दिला ईशारा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - गड किल्ला पवनी, परकोट टेकडीवरील जनतेला नोटीस मिळाले किंवा नोटीस न मिळालेल्या, 300 मीटर मध्ये वास्तव्यास असणारे सर्व अतिमिक्रमणधारक जनतेला सुचित करण्यात येते की, शासनाकडून अतिक्रमण हटवण्याकरिता होणाऱ्या कार्यवाहीला स्थगिती मिळावी व आपले घर पाडण्यात येऊ नये म्हणून दिनांक.22/05/2025 रोज बुधवार ला ठिक 11: 00 वाजता विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल वाघमारे व त्यांचे काही सहकारी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करीत आहेत. तरी सर्व पीडित अतिक्रमण धारकांनी वेळ 10:00 वाजता तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहावे. व शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून योग्य न्याय मागून आंदोलनाची सांगता करण्यात येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!