दोन दुचाकी ची आमोरा समोर भिडंत

दुचाकी चालकांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - सध्या लग्नसराई चे दिवस सुरू असून वाहन चालक बेकायदेशीर रित्या वाहने चालवत असताना अनेकदा बघीतले जाते  मात्र यामुळे अपघात होऊन कुणी गंभीर जखमी तर कुणाला आपला जीव सुध्दा गमवावा लागतो. अशीच एक घटना आज दिनांक. ३१/०५/२०२५  ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या सुमारास चिमूर येथील भय्युजी महाराज शाळे जवळील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर घडली. दुचाकी स्कुटी वाहन क्रमांक. MH-34 BC-4811 आणि दुचाकी वाहन क्रमांक. MH-34 BD-0084 हि गाडी विरुद्ध दिशेने येऊन आमोरा - समोर आपसात भिडंत होऊन अपघात झाला यात दोन इसम किरकोळ जखमी झाले. याबाबत ची माहिती चिमूर पोलीसांना मिळताच क्षणी घटनास्थळावर तात्काळ पोलीस दाखल झाले असता जखमीना प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!