पाथरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका बंद - कर्मचारी मुख्यालयी नाही @ उपसरपंच प्रफुल तुम्मे करणार आंदोलन

 

सावली - पाथरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीका अनेक महिन्यापासून बंद असल्याने व आरोग्य अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नसल्याने पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

     पाथरी आरोग्य केंद्रात परिसरातील २७ गावे येतात. या गावातील रुग्णांना केंद्रात आणण्यासाठी व प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आरोग्य सेवेत रुग्णवाहीका ही अती आवश्यक सेवा आहे. मात्र दीड महिन्यापासून रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी पाठविले असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दीड महिन्यापासून खरंच रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी पाठवली की उडवाउवीची उत्तरे देत आहेत? दीड महिन्यापासून दुरुस्ती का झाली नाही? अती आवश्यक सेवा असतांना याबाबत ग्रामपंचायत कडे माहिती का दिली नाही ? रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी पाठवली की विकली असा प्रश्न उपस्थित करून आरोग्य विभागाविषयीं रोष व्यक्त केला आहे. आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने व मुख्यालयी राहून सेवा देत नसल्याने १० जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा तुम्मे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!