प्रतिबंधित बीटी बियाणे बाळगाणारे इसमांविरुध्द गुन्हा दाखल

४० किलो खुले चोर बीटी बीयाणे किं. ७६,८००/- रुपयाचा मुद्देमाल माल जप्त

राजुरा पोलीस स्टेशन ची कारवाई

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक. २६ मे २०२५ रोजी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे इसम नामे वसंत शंकर पुणेकर रा. भुरकुंडा याचे राहते घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरात एका प्लॉस्टीक चुंगडी मध्ये ४० किलो बीटी बियाणे (HTBT) किंमत ७६,८००/- रुपयाचा माल अवैध रित्या बाळगल्याचे मिळुन आल्याने त्याचे कडे विचारपुस केली असता सदर माल नामे गटन्ना राजन्ना पाकावार रा. सुकडपल्ली ता. राजुरा याचे असल्याचे सांगितल्याने सदर माल आणि दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन सदर बियाणांची पडताळणी व कारवाई करणेसाठी कृषी विभागाला माहिती देण्यात आली. व कृषी विभागाचे अहवालावरुन प्रतिबंधित कापूस (HTBT) बियाणे साठवणूक करून जवळ बाळगणे आधि शासनाची तसेच विक्री च्या उ‌द्देशाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरीता आरोपीतांनी हे बियाणे बाळगले अश्या कृषी अधिकारी नरेश रामकृष्ण ताजने यांचे अहवालावरुन दोन्ही आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस स्टेशन राजुरा यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके,भिष्मराज सोरते, पोहवा विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे व कृषी अधिकारी नरेंद ताजने, पंचायत समिती राजुरा यांनी मिळून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!