कुणी न्याय देता का न्याय..?
स्वास्थ संबंधित समस्येला घेऊन पती-पत्नी उपोषणावर
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी शहरातील भर गच्च असलेल्या पद्मावॉर्ड येथील रहिवासी सुनील महादेव मोहाडीकर हे त्यांच्या पत्नीसह गेल्या चार दिवसांपासून नगर परिषद पवनी कार्यालयाच्या दारात उपोषणावर बसलेले आहेत. सविस्तर असे की सुनील यांचे घरासमोरील परिवारांनी त्यांचे जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर शौचालय बांधून त्याचा सांडपाणी सुनील यांच्या अंगणात सोडलेला आहे. ज्यामुळे सुनील मोहाडीकर यांच्या परिवारात स्वास्थ संबंधित अडचणी निर्माण होत आहेत तसेच याच समस्ये संबंधी मागील काळात सुनील एकदिवशीय उपोषणाला बसलेले होते. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी पवनी यांनी शौचालयाच्या सांडपाण्याचा निचरा करून समस्या दहा दिवसात मार्गी लावून देण्याचा लेखी आश्वासन दिलेला होता. परंतु निष्काळजी मुख्याधिकारी यांनी त्यांचा शब्द न पडल्याने सुनील यांच्या परिवारावर पुन्हा उपोषणावर बसण्याची वेळ आलेली आहे. सुनील यांची स्थिती बिघडत चाललेली असताना सुद्धा संबंधित अधिकारी याकडे पाठ फिरवून बसलेले आहेत.सदर उपोषणाला बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्ष माला समुद्रकर यांनी भेट देत समस्या समजून घेऊन त्यांना समर्थन जाहीर केलेला आहे. यास अनेक पत्रकारांनी उपोषण स्थळाला भेट दिल्याचे त्यांनी भेटीदरम्यान सांगितलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!