अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शेगाव पोलिसांची धडक कारवाई
सहा लाख,पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंंदाम )
वरोरा : - अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर शेगाव पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रेतीची वाहतूक करण्या करीता वापरण्यात येणारा जुना ट्रॅक्टर सहा लाख,रुपये रेती पाच हजार रुपये असा असुन सहा लाख पाच हजार रुपयांचा अवैध मुद्देमालावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे. रात्रोच्या वेळी गस्ती दरम्यान वरोरा तालुक्यातील दिंदोडा गावाजवळ हि घटना घडली.सदर ट्रॅक्टर मालक वाल्मीक देवराव उमरे असून चालक संदीप सदाशिव देवतळे आहे, कलम 303 (2)भा. न्याय सहित कलम 48 (7) 48 (8) महसूल अधिनियम 1966 कलम 3 (1)/181 नुसार कारवाई केली अवैधरित्या रेतीने भरून येत असल्याची गोपनीय माहिती शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांना मिळतात रात्रीच्या गस्त दरम्यान दिंदोडा गावाजवळ ट्रॅक्टरवर कारवाई केली सदर ट्रॅक्टर शेगाव बु, येथील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!