क्रेन च्या धडकेत महिलेचा मृत्यू

चिमूर तालुक्यातील आंबेनेरी येथील घटना

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. १३/०४/२०२५ रोजी चिमूर तालुक्यातील आंबेनेरी येथे सकाळी अंदाजे ९ वाजताच्या दरम्यान गुंड घेऊन हॅन्ड पंप वर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेला भिसी जांभूळघाट मार्गावरील आंबेनेरी येथे क्रेनने चिरडले यात गटनास्थळीच मृत्यू झाले असून मृतक महिलेचे नाव शारदा मधुकर डांगे वय ५८ वर्षे  राहणार आंबेनेरी व्यवसाय मजुरी असे आहे.यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली असून गोसे च्या कालव्याच्या नहराच्या कामावरील हि क्रेन असल्याचे सांगितले जात आहे. तर महिंद्रा बोलेरो पिकअप कॅम्पर या वाहणाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पलटी मारून आंदोलन केले असता तब्बल ४ तास महिलेचे शव घटनास्थळावरून न हलवीता तनावाची परिस्थिती कायम ठेवली तर दुपारी ०१:०० वाजताच्या दरम्यान शव विच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतक महिलेच्या कुटुंबात एक मुलगी व दोन मुले, पती असा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांतर्फे सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!