खेडी येथे महिलांच्या विविध कार्यक्रमाने महिला दिन साजरा

 


सावली - खेडी येथे महिलांच्या कबड्डी सह विविध स्पर्धा घेऊन महिला दिन साजरा करण्यात आला. 

   सावली तालुक्यातील खेडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. गावातून महिलांनी रॅली काढून शिक्षण, स्वछता यावर घोषणा दिल्या. दिवसभर महिलांच्या धावस्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रस्सीखेच, चमचा गोळी व कबड्डी स्पर्धा पार पडले. रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात समूहिक नृत्य, एकल नृत्य, गितगायन व नाटिका सादर करण्यात आले. गावातील देणगीदारांकडून महिलांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी विजेत्यांना रोख रक्कमही दिला गेला असून संपूर्ण कार्यक्रम महिलांनी आयोजित केलेला होता. संपूर्ण गावाचे गावभोजनही करण्यात आले. दरवर्षी अशा प्रकारे उत्साहाचे वातावरणात खेडी येथे महिला दिन साजरा केला गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!