आयुषचे होते आयुष्य म्हणून वाचला वाघाच्या तावडीतून - आजोबा मात्र सापडले तावडीत
मुल - शहरापासून सोमनाथ रोडला हाकेच्या अंतरावर वाघोबाने आजोबाचा बळी घेतला मात्र कुशीतच झोपलेल्या आयुष या नातवाचे आयुष्य होते म्हणून वाचला असल्याची प्रचिती आली.
मुल शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर शेतात रात्री मुक्कामी नेहमीप्रमाणे मल्लाजी येगेवार हे मेंढ्यांचा कळप घेऊन मुक्कामी आभाळाच्या छत्रछायेखाली झोपले होते. सोबतच त्यांचा नातू पाचव्या वर्गात शिकणारा आयुष्य दत्तू येगेवार हा सुद्धा आजोबाच्या कुशीत झोपला होता. आयुषला सकाळी 4 वाजता जाग आली आणि बघतो तर आजोबा गायब होता व बाजूला रक्त सांडलेले दिसलें. आयुष घाबरला मात्र प्रसंगावधान राखत मुल येथे घरी जाऊन आजोबा नसल्याची माहिती दिली. कालच एक मेंढपाळ वाघाचा बळी ठरल्याने वाघानेच हल्ला केला असेल अशी शंका आली व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता आजोबाचे धडावेगळे शरीर आढळले. या भयानक घटनेत आयुषला काहीच न झाल्याने काळ आला पण वेळ आली नसल्याने आयुषचे आयुष्य वाचले.
%20(26).jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!