शेष नगर पवनी येथे रंगपंचमी उत्साहात
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१४/०३/२०२५ ला स्थानिक शहरातील शेष नगर पवनी येथे रंगाचा उत्सव रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत,विविध वयोगटातील मंडळींनी रंगांची उधळण व नृत्य पारंपारिक पद्धतीने करून हा सण साजरा केला.यामुळे वातावरण उत्साही आणि रंगानी भरले शहरातील विविध ठिकाणी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पर्यावरणाचे भान राखून नैसर्गिक रंगाचा वापर केला.या रंगपंचमीने सर्वांना आनंद आणि उत्साह दिला.तसेच नात्यांमध्ये गोडवा वाढवला.ठीक ठिकाणी विविध अल्पोहाराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!