कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार 17 जागासाठी निवडणूक - आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील अर्जावरील अपील नाकारली

सावली (विजय कोरेवार )

सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून 18 जागेसाठी 70 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले मात्र छाननीत 7 अर्ज अवैध ठरले असून 63 अर्ज वैध ठरले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षित जागेत अर्जदारांच्या अज्ञानामुळे सर्व अर्ज अवैध ठरले होते. या निर्णयाविरुद्ध अपीलही फेटाळल्याने आता 17 जागेसाठी निवडणूक होणार आहे.

        सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीच्या 18 जागेकरीता 70 जणांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. नामनिर्देशन पत्राचे छाननीत ग्रामपंचायत गटातील 13 पैकी 4 शेतकरी प्रमाणपत्र नसल्याचे कारणांनी अवैध ठरले तर आर्थिक दुर्बल घटकातील 3 पैकी 3 अर्ज अवैध झाले. आता 17 जागेसाठी सध्या 63 उमेदवार रिंगणात असून अर्ज मागे घेणे सुरु आहे. 

      आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण बाबतची अपील फेटाळली !

आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. सदर आरक्षण सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यासारख्या आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. सदर आरक्षण आर्यवैश्य, कोमटी, ब्राम्हण, मराठा या जातीतील 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचेसाठी होते. परंतु हे आरक्षण पहिल्यांदाच असल्याने नामांकन दाखल करणाऱ्यांच्या लक्षात आले नाही व दारिद्र्य रेषेखालील दाखला सादर केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसीलदार यांचे आर्थिक दुर्बल गट प्रमाणपत्र नसल्याचे कारण दर्शवून अर्ज रद्द केले. याविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकार यांचेकडे सदर गटातील उमेदवारांनी अपील दाखल केली मात्र हे अपील खारीज करीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. यामुळे आर्थिक दुर्बल गटाचे पद रिक्त राहणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!