काम करायची इच्छा नसल्याने मॅडमची नागरिकांसोबत उद्धट भाषा - तक्रार करून बदली करा असे आवाहन
मुल - एखाद्या ठिकाणी काम करायची इच्छा नाही पण नियमानुसार बदली होत नसल्याने नागरिकांना त्रास द्यायचा व तक्रारी बदली करून घ्यायचा नवीनच फंडा मुल उपविभागीय कार्यालयातील इंगळे मॅडमचा अनुभवायला मिळत आहे.
आमचे प्रतिनिधी नातेवाईकाच्या अपघाती समरी अहवालसाठी मुल उपविभागीय कार्यालयात पोहचले. सदर काम येथील इंगळे नामक महिला कर्मचाऱ्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्या मॅडमकडे याबाबत विचारणा केली असता तुम्ही सोमवारी या हेच उत्तर मिळाले. यावर आमच्या प्रतिनिधिने यावर सोमवार हा दिवस ठरला आहे का? असे विचारल्यावरून मॅडम भडकल्या. मला वेळ नाही माझी तक्रार करून बदली करा, माझी इच्छाही या ठिकाणी काम करायची नाही. एखाद्या ठिकाणी काम करायची इच्छा नसल्याने नागरिकांनी तक्रार करण्यासाठी त्यांचे काम करायचे नाही असा नवीनच फंडा मॅडमचा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!