चार ट्रॅक्टर एक जेसीबी वाहन कारवाई न करता दिली सोडून

चिमूर तहसील चा उपक्रम 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दिनांक. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खडसंगी जवळील शिवापूर बंदर येथे सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास ४ ट्रॅक्टर मातीने भरलेली तसेच १ jcb मशीन स्थानिक गावाकऱ्यांच्या समक्ष पकडून चिमूरकडे वाहन राष्ट्रीय महामार्गाने नेत जप्त करण्याचा देखावा महसूल अधिकारी यांनी जनतेला दाखवीत वाहने सोडून दिल्याचा प्रकार पुन्हा उघळकीस आला आहे. हि घटना प्रथम नसून या अगोदर दिनांक. ०४/०२/२०२५ ला रेतीने भरलेले ४ हायावा ट्रक चिमूर तहसील कार्यालयात जप्त केलेले वाहन भल्या पहाटेच अंधाराचा फायदा घेत कारवाई न करता सोडून दिल्याचा प्रकार चर्चेत असतांना जिल्हाधिकारी यांना याबाबत चे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे देण्यात आले असून चिमूर चे तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांची याप्रकारणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली असतांना देखील अशाप्रकारे अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनांनवर देखाव्याची कारवाई योग्य नाही? हि सर्व वाहने सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याचे बोलले जात आहे. जुन्या लोकांची म्हण आहे मोठ्यांचे ठेवा झाकून आणि छोट्यांचे बघा वाकून हे या सर्व प्रकारावरून सत्य ठरत आहे. यामुळेच या माफियांची गुंडागर्दी वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न जनतेपुढे उपस्थित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!