मागील चार महिन्यापासून जनतेचे पैसे जनतेला मिळण्यास टाळाटाळ...

शिवलक्ष्मी पतसंस्थे कडुन खातेदारांना आपलेच पैसे काढण्यासाठी तारीख पे तारीख


वरोरा....
तालुक्यातील  शेगाव (बु ) मध्ये शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मागील ३ वर्षां पासून कार्यरत आहे. शेगाव येथील बाजारपेठ ही मोठी असल्या कारणांनी रोज लाखो रुपयाची बचत या पतसंस्थेमध्ये होत असते. या पतसंस्थेमध्ये व्याजदर आकर्षक असल्या कारणांनी अनेक व्यापारी, गावातील तसेच परिसरातील नागरिक यांनी लाखो रुपयाची बचत खाते स्वरूपात, दैनिक बचत स्वरूपात तसेच ठेवी स्वरूपात या पतसंस्थेमध्ये केली आहे. मागील ३ वर्षा पासून सगळे व्यवहार सुरळीत सुरु असताना मागील चार महिन्यापासून पतसंस्थेच्या ग्राहकांना पैसे काढताना वारंवार चक्रा माराव्या लागत आहे. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली असून लग्न समारंभ,  आरोग्यासाठी तसेच इतरही कामासाठी पैस्याची गरज पडली असता ग्राहकांना संस्थे मधून साधे १ हजार रुपये सुद्धा विड्रॉल होत नसल्या कारणांनी ग्राहकांना तारीख पे तारिख मिळत आहे. तसेच ग्राहकांना सध्या शिवलक्ष्मी पतसंस्थेतून ५ ते १०  हजार रुपयाचा विड्रॉल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे इतर दैनिक बचत ग्राहकांनी या मध्ये दैनिक बचत करणे सुद्धा बंद केले आहे. व या शिवलक्ष्मी महिला पतसंस्था मध्ये माहिती नुसार शेगाव तसेच परिसरातील ग्राहकांचे अंदाजे ८० लाख रुपयाचा जमा असून मुद्दत भरून सुद्धा ग्राहकांना पैसे मिळत नसल्या कारणांनी जमा केलेले पैसे गेले कुठे हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
परंतु या पतसंस्थेच्या संचालकाकडून ग्राहकांना तारीख पे तारीख मिळत असल्याकारणांनी शिवलक्ष्मी महिला नागरी पाठसंस्थेच्या ग्राहकांनी जायचे कुठे हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. या सदर्भात आमचे प्रतिनिधी  शिवलक्ष्मी महिला नगरी पतसंस्था यांचेशी फोनद्वारे माहिती घेतली असता आम्ही शेगाव शाखेतील पैसा इतर ठिकाणी गुंतवीला असल्या कारणांनी तिथून आम्हाला पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकांना विड्रॉल केलेले रक्कम देण्यास विलंब होत आहे अशी माहिती यांनी दिली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!