आकापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा 2025 साजरा.
नागभीड तालुक्यामधील आकापूर या गावांमध्ये *शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था आकापूर.* यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2025 साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी गावामध्ये रॅलीचे आयोजन करून त्यानंतर प्रमुख मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 18 फेब्रुवारीला ग्रामपंचायत आकापूर तर्फे निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा *माझी वसुंधरा* या विषयावर घेण्यात आली व शिवस्वराज्य संघटनेच्या वतीने चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यात आलेल्या होत्या. संघटनेमार्फत शासकीय नोकरीवर लागलेल्यांचे सत्कार करण्यात आले, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधान सभा
सहउद्घाटक मा.संतोष भाऊ रडके भाजपा नागभिड तालुका अध्यक्ष , अध्यक्ष विनोद भाऊ बोरकर अध्यक्ष लक्ष्मी पत संस्था तलोधी, प्रमुख मार्गदर्शक- खोजराम भाऊ मरस्कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर,
उपाध्यक्ष कुणाल गहाणे सरपंच ग्रामपंचायत आकापुर , संगीता हेलोंडे मॅडम ठाणेदार तलोधी पो. स्टेशन
प्रमुख पाहुणे-हेमंत लांजेवार माजी सरपंच उश्राळ मेंढा ,देवेंद्र गेडाम सरपंच ग्रामपंचायत वाढोना, गायधने सर, रतिरामजी निकूरे सर, डेव्हिड मेश्राम ग्राम अधिकारी आकापुर , व्यंकटेश भाकरे, सुखदेवजी भाकरे, वलके सर, नरेश गाहाने ,राऊत सर , गाडगे मॅडम कृषी सहाय्यक , गवई मॅडम कृषी सहाय्यक, दमके सर, मदनकर सर ,कोचे मॅडम , भोयर सर , अश्विनी मॅडम,पुंडलिक बाळबुद्धे अध्यक्ष शाळा व्य. समिती, नीताताई बोरकर, प्रीती मिलिंद भाकरे विलास पा. भाकरे, गुरुदेव निकुरे, मोतीराम पा. भाकरे, अतिश भाकरे सुरेश सडमाके पोलिस पाटील व प्राथमिक शाळाआकापूर येथील संपूर्ण शिक्षक वृंद व संपूर्ण आकापूर वाशीय यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन अमोल टी भाकरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन भाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत भाकरे यांनी केले.
संपूर्ण शिवस्वराज्य संस्थेचे सभासद यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!