पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधुन, पोलीस स्टेशन चिमुर येथे विद्यार्थ्यांना शस्त्र - दारुगोळा अशा विविध विषयावर दिली माहिती
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - 2 जानेवारी 2024 पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधुन, पोलीस स्टेशन चिमुर येथे आज दिनांक. 04/01/2025 ला चिमुर शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिमुरचे विद्यार्थी - विद्यार्थींनी व शिक्षक यांना पो.स्टे.ला बोलावुन पोलीस कामकाज, शस्त्र व दारूगोळा, सायबर गुन्हेगारी, लैगिंक गुन्हेगारी, पंतग उडविताना नायलॉन मांजाचा वापर टाळणे व आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक डायल-112 तसेच सायबर हेल्पलाईन क्रमांक.1930 याबाबत माहीती पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी तसेच त्यांचे सहकारी पोस्टाफ दिली. सदर उपक्रम कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोउपनि घनश्याम नवघरे, प्रो-पोउपनि दत्ताहरी जाधव तसेच पोलीस अंमलदार भरत घोळवे, कुणाल दांडेकर, सौरभ महाजन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिमुरचे 03 शिक्षक व 25 मुले व 30 मुली असे एकुन 55 विद्यार्थी यावेळी हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!