ब्रेकिंग मूलच्या तहसीलदार यांचे घरात चोरी



मूलच्या तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे यांचे घरी चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे. 
तहसीलदार श्रीमती मोरे काही काळाकरिता रजेवर गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर, त्यांचे घराचे दरवाजे खिडक्या चोरांनी फोडून त्यांचे घरात चोरी केल्याची माहिती आहे. चोरी झाल्याचे आणि घरातील शुल्लक सामान चोरट्याने लंपास केल्याचे तहसीलदार श्रीमती मोरे यांनी पब्लिक पंचनामाशी बोलताना सांगितले. 
ज्या घरी तहसीलदार मृदुला मोरे किरायाने राहतात ते घर देखील एका पोलीस कर्मचाऱ्यांचे असल्याची माहिती आहे. 
चोरट्यांनी तहसीलदाराचे घरही सोडले नसल्याची खमंग चर्चा आता मूल शहरात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!