कलियुगानुसार ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना !सौ.दिपाली सिंगाभट्टी,


कलियुगानुसार ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! सौ.दिपाली सिंगाभट्टी,
चंद्रपूर -
अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्‍मिक असते. त्‍यामुळे अशा समस्‍या दूर करण्‍यासाठी आध्‍यात्‍मिक स्‍तरावरील उपाय, म्‍हणजे ‘साधना’ करणे आवश्‍यक असते आणि सध्‍या कलियुगानुसार ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्‍थेच्‍या सौ. सिंगाभट्टी यांनी साधना प्रवचनाला उपस्‍थित जिज्ञासूंना केले. 
सनातन संस्‍थेच्‍या वतीने घुग्गुस येथील प्रयास सभागृह मध्ये दिनांक ०७/०१/२०२५ ला साधना प्रवचनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या साधना प्रवचनाचा लाभ १६० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी सौ. सिंगाभट्टी यांनी साधनेचे विविध मार्ग, कलियुगात योग्‍य साधना कोणती ?, आहे ? कुलदेवता आणि श्री गुरूदेव दत्त यांच्‍या नामजपाचे महत्त्व इत्‍यादी विषयांवर विस्‍तृत मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!