संविधानामुळे भारताची लोकशाही जिवंत - ॲड. महेंद्र गोस्वामी
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी येथील स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथे भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात "संविधानाची निर्मिती आणि त्याचे महत्त्व" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या "घर घर संविधान" संकल्पने अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी संविधानाचे अभ्यासक तथा माजी न्यायाधीश अँड. महेंद्र गोस्वामी यांना पाचारण करण्यात आले होते.ॲड महेंद्र गोस्वामी यांनी यावेळी संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य या विषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानामुळे भारताची लोकशाही जिवंत आहे,असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा.आकरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका भारती माळवी यांनी केले. या कार्यक्रमाला वैनगंगा शिक्षण संस्थेच्या संचालिका भावना तर्वेकर तसेच उप प्राचार्य अजय ठवरे आणि जेष्ठ शिक्षक मुस्तफा बेग उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!