रोजगाराच्या संदर्भात वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात सभा संपन्न...

रोजगाराच्या संदर्भात वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात सभा संपन्न...

वरोरा.... जगदीश पेंदाम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर अंतर्गत येणाऱ्या वडाळा, घोसरी, काटवल, सोनेगाव,कोकेवाडा, अर्जुनी तुकुम  या गावातील जंगलालगत क्षेत्रातील अग्नि रक्षक, कुटी गेट मजूर, मदतनीस, पीआरटी टीम यांची वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालय या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले..

ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोरमध्ये उन्हाळ्यामध्ये लागत असलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोर जंगलालगत असलेल्या गावातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात येते, सन 2025 मध्ये काम करणारे रोजंदारी कामगार पूर्णता आगीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश प्राप्त करावे यासाठी मार्गदर्शन  ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांनी केले.
यावेळी उपस्थित वनपाल नन्नावरे काटेझरी, वनपाल कामटकर सोनेगाव, वनपाल भानुसखिंडी शेख,वनरक्षक जुडे, वगारे, लटपटे,भोयर,वसुरे,जानेकर,
सोयाम, राजगडे, प्रधाने,फायर वाचेर,अध्यक्ष प्रहार जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण, वन कर्मचारी,पी आर टी परिसरातील गावातील नागरिक आदी उपस्थित होते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!