मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना 6 महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त असलेल्या पदाकरीता कायमस्वरूपी रुजू करून घेने बाबत चे तहसीलदारांना दिले निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक. 06/01/2025 ला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनेत रुजू असलेले यांनी बहुमोठा जणसमूह गोळा करून पंचायत समिती पवनी येथे जमा होऊन तहसीलदार तथा मुख्य कार्यकरी आधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना कार्यकाळ वाढविण्याबाबद व वेडेवर मानधन मिडण्याबाबद चे निवेदन देण्यात आले. शासन निर्णय अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी महाराष्ट्र राज्य स्तरावार सुरू केलेल्या मा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत अनेकांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे.व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठरावीक कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षण कालावधी दरम्यान मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातुन आम्हाला शासकीय कामकाजाची अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्या नंतर आस्थापणात रिक्त पदांवर शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करूण घेण्यात यावे.सर्व प्रशिक्षणार्थी जर शासकीय सेवेत कायमस्वरूपी रूजू झालो तर निच्छितच येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी अतिउत्कृष्ट योगदान देत आहे.म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण 6 महिन्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे.
व सर्व प्रशिक्षणार्थी यांना 6 महिने प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देऊन सरळसेवा भरतीत आरक्षित ठेवून अट न लावता सर्व प्रशिक्षणार्थीची शैक्षणिक पात्रता पडताळणी करून कायम स्वरूपी सेवेत घेण्यात यावे.अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी पवनी तालुक्यातील पदाधिकारी व सर्व विवीध क्षेत्रातील कार्यरत असलेले तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अनिकेत भूरे ( अध्यक्ष), प्रफुल कुलुरकर ( उपाध्यक्ष),आयुष वरंभे (सचिव), रिंकेश नखाते ( मुख्य कार्यकारी), रेणुका पचारे (सह सचिव ), ऐश्वर्या बुलबुले ( कोषाध्यक्ष), अनिल जांभूरे (सोशल मीडिया ), प्रमुख,नितेश कुर्झेकर ( सदस्य),आकाश रायकवार ( सदस्य),विपीन मेश्राम (सदस्य), राजेश पडोळे (सदस्य), रवींद्र जांभुळकर ( सदस्य),श्रुती शिंगाडे ( सदस्य) उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!