शेतकरी कुटुंबास इन्शुरन्स कपंनीने अपघात विमा नाकारले - ग्राहक मंचाच्या आदेशाने व्याजासह विमा मंजूर

 

सावली - शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबाने गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेंतर्गत दावा दाखल केला मात्र कपंनीने विमा रक्कम देण्यास नकार दिला. याविरोधात माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे मार्गदर्शनात ग्राहक मंचात प्रकरण दाखल केले. ग्राहक मंचाचा निकाल शेतकरी कुटुंबाच्या बाजूने लागल्याने व्याजासह विमा मिळाला.

          तालुक्यातील चांदली बुज. येथील रामाजी मर्लावार यांचे दुचाकीवर मागे बसून जात असतांना अपघात झाला व त्यांचा मृत्यू झाला. मृतक शेतकरी असल्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत पत्नीने दावा दाखल केला मात्र वाहन चालवीण्याचा परवाना नसल्याचे कारण दाखवीत त्यांचा दावा नाकारला. ओरिएंटल एन्शुरन्स, जायका इन्शुरन्स व तालुका कृषी अधिकारी यांचे विरोधात विजय कोरेवार यांचे मार्गदर्शनात ताराबाई मर्लावार हिने जिल्हा ग्राहक तक्रार चंद्रपूर यांचेकडे दावा दाखल केला. चार वर्षानंतर ग्राहक मंचाने शेतकऱ्यांचे बाजूने निर्णय देत विरुद्ध पक्षास 2 लाख विमा, प्रकरण दाखल केल्यापासून अर्जदारास 9 टक्के व्याज व अर्जदारास झालेला त्रास 10 हजार रुपये भरपाई देण्यास आदेश दिले. सदर प्रकरणात अर्जदाराचे बाजूने ऍड. अजय भोयर, ऍड. विजय मोगरे यांनी युक्तिवाद केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!