पोंभूर्णाची वाघीण मूलच्या परिसरात! सतर्कतेचे वन विभागाचे आवाहन
पोंभूर्णा परिसरातील वाघीण मूल परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही वाघीण मालेगाव, चितेगाव, बेलगाटा, मोरवाही परिसरात असल्याचे सांगितल्या जात आहे.
एका व्हाट्सअप ग्रुप वर याबाबत सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी समूहाने शेतीचे काम करावी, गुराख्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या वाघिणीच्या गळ्यात पट्टा असून, ती परत पोंभूर्णा परिसरात जाईल असेही या व्हाट्सअप ग्रुपच्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
वन विभागाच्या नावाने ही पोस्ट असून ती खालील प्रमाणे आहे.
अत्यंत महत्त्वाचे .
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मौजा मरेगाव येथील समस्त नागरीकांना कळविण्यात येते की आपल्या मरेगाव शेत शिवारात पोंभूर्णा येथील पट्टेदार वाघीण दाखल झाली असून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात एकत्र येऊन काम करावे.तसेच गावातील गुराख्यानी आपली जनावरे चराईसाठी नेत असताना विशेष लक्ष ठेवावे.कोणीही शेतशिवारात एकटे जाऊ नये.
🙏आपले विनीत🙏
वनविभाग
...
सदर वाघीण मोरवाही ते चिखली, चितेगाव परिसरात असल्याची माहिती सकाळी मिळाली असून गावातील सर्व शेतकरी, व गुराखी यांनी सतर्क राहून आपापली कामे करावीत.
...
सदर वाघिणीला गळ्यात पट्टा लावलेला आहे. तिला परत पोंभुर्णा च्या जंगलात जायचे असल्याने ती शेतपरिसरात फिरत आहे, सर्वांनी सतर्कता बाळगा
...
ती नक्कीच आपला परिसर सोडून जाईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!