८ वर्षीय बालकाला अमानुष मारहाण प्रकरणी दोन आरोपींची तुरूंगात रवानगी
एका आरोपीची शोध मोहिम सुरू
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत स्थानिक ८ वर्षिय बालकाला माजी प़ाचार्य, पत्नी व २५ वर्षे वयाचा मुलगा यांनी त्यांच्या वाहनाला हात लावला म्हणुन अमानुष मारहाण केली. होती. याप़करणात दोन आरोपींना शनिवार ला अटक करून रविवार ला न्यायालयात दाखल केले असता त्या दोन आरोपींची तुरूंगात रवानगी केलेली आहे.
प़ाप्त माहीती नुसार बुधवार ला सकाळी अंदाजे १० वाजताचे सुमारास पिढीत बालक मंथन शंकर रामटेके वय ८ वर्षे याला सेवा निवृत्त माजी प़ाचार्य सुधाकर पांडुरंग गोहणे, पत्नी कांचन सुधाकर गोहणे व मयुर सुधाकर गोहणे वय २५ वर्षे सर्व राहणार भिसी यांनी त्यांच्या वाहनाला हात लावला म्हणुन दिडशे फुट अंतरावरून ओढत नेऊन आपल्या घरी माळ्यावर व खालच्या परिसरात अमानुष पणे लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. मात्र पोलीसांनी एन सी पावती देऊन आरोपींना मोकाट सोडल्यामुळे पिढीत बालकाच्या आईने पुन्हा तोंडी तक़ार दिल्याने प़भारी ठाणेदार निशांत फुलेकर यांनी तिन्ही आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), १२७(२) व अनुसुचित जाती - जमाती अत्याचार प़तिबंधक अधिनियम- १९८९, ३(२) (व्हि ए) नुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर चिमूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी तपास आपल्या हातात घेऊन सुधाकर पांडुरंग गोहणे व कांचन सुधाकर गोहणे या दोन आरोपिंना शनिवार ला अटक करून रविवार ला न्यायालयात दाखल केले असता दोन आरोपींची तुरूंगात रवानगी केलेली आहे. तर आरोपी मयुर सुधाकर गोहणे याचा शोध सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!