3 खुल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील चिमूर येथील हृद्यांश काटेकर ची छाप
खुल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत चिमूर चा रहिवासी असलेल्या हृदयांश उमेश काटेकर ने धमाकेदार कामगिरी करीत दोन कांस्य पदकांची केली कमाई
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - गुजरात मधील सुरत येथे असलेल्या पी.पी. सवानी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल सुरत येथे नुकत्याच 22 डिसेंबर 2024 ला पार पडलेल्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चिमूर स्केटिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 10 वर्ष वयोगटातील हृद्यांश ने शॉर्ट रेस 2 लॅप क्वार्ड्स स्केटिंग प्रकारात तिसरे स्थान निश्चित करत कांस्य पदक पटकावले. तसेच लॉन्ग रेस 5 लॅप क्वार्ड्स स्केटिंग प्रकारात सुद्धा तिसरे स्थान निश्चित करत कांस्य पदक पटकावले. व आपले स्थान आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निश्चित केले या दमदार कामगिरीसाठी सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे. खेळाडू चिमुर स्केटिंग अकॅडमी चा नियमित खेळाडू असून त्याने या यशाचे श्रेय आपल्या आई - वडील तसेच प्रशिक्षक यांना दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!