सावली येथील उपोषण अप्पर जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर समाप्त - 30 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
सावली - अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा चंद्रपूर शाखा सावली तालुकाच्या वतीने गुरुवारपासून अतुल कोडापे व आदिवासी कार्यकर्त्यांकडून आदिवासी समाजाच्या विविध मागण्या घेऊन उपोषण सुरु होते. या उपोषणास अप्पर जिल्हाधिकारी यांनी भेट देत 30 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आश्वासन दिल्याने उपोषण समाप्त करण्यात आले.
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद चे युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे, उत्तम गेडाम, अशोक कनाके, पुरणबापू मडावी, रमेश कनाके हे आदिवासी कार्यकर्ते समाजाच्या विविध मागण्या घेऊन 19 डिसेंबर पासून आमरण उपोषणास बसले होते. उपोषणास गडचिरोली चिमूर चे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी भेटी देत मागण्या समजून घेतले मात्र जिल्हाधिकारी उपोषण स्थळी आल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला. आज अप्पर जिल्हाधिकारी चौधरी यांनी उपोषकर्त्यांची भेट घेत सर्व मागण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात 30 डिसेंबरला बैठकीचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण कर्त्यांना सरबत देत उपोषण सोडवले.
यावेळी उपोषण स्थळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, गो ग पार्टी बापू मडावी, युवराज उईके, भास्कर गेडाम, यात्रिका कुमरे आदी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!