पाच वर्षापासुन रेंगाळलेल्या 'त्या' सभागृहामुळे वडेट्टीवार अडचणीत
पाच वर्षापासुन रेंगाळलेल्या 'त्या' सभागृहामुळे वडेट्टीवार अडचणीत
![]() |
| हळदा येथील बौध्द वस्तीतील केवळ फाउॅडेशन झालेले सभागृह |
तत्कालीन मदत व पुर्नवसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील बौध्द वस्तीत सामाजीक सभागृहाचे काम मंजूर केले, 15 लक्ष रूपयाचा निधीही मंजूर केला मात्र फाउडेंशन व्यक्तीरिक्त मागील पाच वर्षात एकही काम न झाल्यांने, दलित बांधवात संताप व्यक्त केला जात आहे.
सन 2021—22 मध्ये बौध्द वस्तीत हे सामाजीक सभागृहाचे काम मंजूर झाले होते. मात्र पाच वर्षात ते पुर्ण न झाल्याने, आता मतदान मा्गण्याकरीता, येत असलेल्या विजय वडेट्टीवार यांना मतदारांचे रोषाला बळी पडावे लागत आहे.
गावकर्यांचा सभागृहाचे कामही अडगळीत!
ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे 30 लक्ष रूपये किमंतीचे सभागृहाचे अर्धवट काम पाच वर्ष पूर्ण होवूनही पुर्णत्वास न आल्यांने, मतदारात संताप व्यक्त केला जात असून, यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे चांगलेच अडचणीत आले आहे. गावात विजय वडेट्टीवार यांचे प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्याना यावर उत्तर देताना चांगलीच दमछाक होत आहे.
विजय वडेट्टीवार हे मदत व पुर्नवसन तसेच बहुजन कल्याण मंत्री असतांना सन 2021—22 मध्ये गावात लग्नकार्याकरीता 30 लक्ष रूपये किमंतीचे सभागृह मंजूर केले होते. या सभागृहाचे कामाला सुरूवातही झाली मात्र काम अर्धवट ठेवल्यांने, शासनाचा निधी संपूर्ण वाया गेला आहे. हे काम पूर्णत्वास आणावे अशी गावकर्यांनी अनेकदा विजय वडेट्टीवार यांचेकडे विनंती केली, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने, हे सभागृह व परिसराला खंडहारचे स्वरूप मिळाले आहे.
विकासाचा गवगवा करणारे विजय वडेट्टीवार यांना हळदाचे नागरीकांनी याच सभागृहावरून घेरत असून, यामुळे विजय वडेट्टीवार चांगलेच अडचणीत आले आहे.
मंत्री असतांना विजय वडेट्टिवार यांनी अनेक गावात कामाचे भुमीपुजन केले. कामाला सुरूवातही केली, मात्र अनेक गावातील कामे पाच वर्षापासून अपुरेच असल्यांने, त्यांना मतदार आता 'भूमीपुजन मंत्री' असे संबोधीत आहे. उल्लेखनीय म्हणजे व्याहाड—गांगलवाडी या एकाच रस्त्याचे तिनदा भूमीपुजन करून, एकदाही काम सुरू न करण्यांचा विक्रम विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या सर्व कामाची आता निवडणूकीच्या धामधुमीत चर्चा सुरू असून, मतदाराना हलक्यावर घेणार्या वडेट्टीवार यांना मतदार हलक्यावर घेणार कि पुन्हा डोक्यावर बसविणार याचे उत्तर 20 नोव्हेंबरला ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!